महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्र-दिवस मेहनत करत आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला (Police Officer) कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या गावी गेले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपाचारासाठी रुग्णालयात गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यातच रामदास आठवले यांच्या मुंबईतील सुरक्षा ताफ्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी त्याच्या गावी गेल्याचे समजत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ जाणवत असल्याने त्यांनी नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती टीव्ही9 मराठी वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Lockdown: ग्रामीण महाराष्ट्रात MGNREG कामे सुरु; रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती
डॉक्टरांच्या प्रति आदर जास्त वाढला ; कोरोनमुक्त झालेली व्यक्ती सांगतेय रुग्णालयातील अनुभव - Watch Video
भारतात आतापर्यंत एकूण 19 हजार 984 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 640 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजार 870 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 218 वर पोहचली आहे. यापैंकी 251 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत.