Coronavirus Lockdown: लॉकडाउनच्या काळात  पोलिस, वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हात उचलणार्‍यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा; स्वयंशिस्त पाळा,  राज्यात लष्कराची मदत घेण्याची वेळ आणू नका!
Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता 124 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशी सुचना दिली जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसात लॉकडाउनची स्थिती असताना सुद्धा नागरिक घरी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी नियमांचे आदेश न पाळणाऱ्यांच्या विरोधात पोकळ बांबूचे फटके देण्यास सुरुवात केली आहे. पण दुसऱ्या बाजूला पोलिसांनी केलेल्या कारवाईला झुगारुन त्यांनाच मारहाण करत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता नागरिक आणि पोलिसांनी स्वयंशिस्त आणि संयम पाळावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहेत. राज्यात लष्कराची मदत घेण्याची वेळ आणून देऊ नका असा ही इशारा नागरिकांना अजित पवार यांनी दिला आहे.

राज्यात पुढील 21 दिवस लॉकडाउनची परिस्थिती कायम राहणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक गोष्टींचा साठा अतिप्रमाणात घरात करुन ठेवू नये असे सांगण्यात आले आहे. पण घराबाहेर विनाकारण पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून फटके दिले जात आहेत. मात्र नागरिकांनी पोलीस, डॉक्टर्सवर हात उगारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सुद्धा लष्कराची मदत घेण्यास भाग पाडू नका असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. तसेच गरोगरिबांसाठी पुढे येऊन स्वयंसेवीस्थांनी मदत करावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(डॉक्टर मारहाण प्रकरणी मालेगावचे एमआयएएम आमदार ईस्माइल शेख यांच्यावर गुन्हा दाखल) 

राज्यात संचारबंदी आणि जिल्ह्याच्या सीमा बंदचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून पोकळ बांबूचे फटके सुद्धा दिले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर आता बीड येथे घराबाहेर थांबण्यास पोलिसांनी नागरिकांना विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.