मुंबई विमानतळावरील CISF हेडकॉन्टेबलची कोरोनाची लागण झाल्यानंतर आज मृत्यू
CSIF (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाशी लढायचे असल्यास लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी दिवसरात्र काम करुन आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता सीआयएसएच्या एका हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. या हेडकॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले होते. यापूर्वी पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे 55 वर्षावरील पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाच्या परिस्थितीत काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

सीआयएसएफ मधील आता पर्यंत 32 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याची वर्गवारी करुन कोरोनाची परिस्थिती पाहता नियम शिथिल करण्यात आले आहेत. तर 4 मे रोजी राज्य सरकारने कंन्टेंटमेंट झोन सोडून अन्य ठिकाणी दारुची दुकाने सुरु होणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यावेळी नियमांचे उल्लंघन केल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.(महाराष्ट्रात पोलीस दलातील 487 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. तर 412 जणांचा मृत्यू झाला असून 1694 जणांची प्रकृती सुधारली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आतापर्यंत 2,24,219 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 649 जणांना क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. राज्य सरकारकडून 4,35,030 स्थलांतरित कामगारांसाठी 4,738 रिलिफ कॅम्पस उभारण्यात आले असून त्यांना अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत.