Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; अजित पवार, बाळासाहे थोरात, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, इम्तियाज जलील, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर यांची उपस्थिती
CM Uddhav Thackeray in Video Conference

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट लॉकडाऊन (Lockdown) आणि एकूण परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे समजते. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडत आहे. या बैठकीस 18 प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होणार असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सहभागी झाले आहेत.

दरम्यान,विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर , जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई आदी नेत्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Lockdown: मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन; लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांबाबत चर्चा)

दरम्यान, या बैठकीचे वैशिष्ट्य असे की, कोरोना व्हायरस, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय  नेत्यांची बोलवलेली ही पहिलीच बैठक आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी पत्र लिहूण, मुख्यमंत्र्यांना फोन करुन अनेकदा चर्चा केली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आदी मुद्द्यांवरुन सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.