SP MLA Abu Azmi | (Photo Credits-Facebook)

आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे. आबू आझमी हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. लॉकडाऊन (Lockdown) नियमांचे उल्लंघन, मास्क न वापरणे, गर्दी जमवणे यासोबतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांना अपशब्द वापरल्याचा आरोप अबू आझमी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय सरकारि कामात आडथळा आणल्याचाही आरोप आमदार आझमी यांच्या विरोधात नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 27 मे रोजी काही गाड्या सोडण्यात येणार होत्या. या गाडीने प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी स्टेशन परिसरात जमले होते. या वेळी कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शालिनी शर्मा या प्रवाशांना माहिती सांगत होत्या. तसेच ज्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्याबाबतही माहिती देत होत्या. (हेही वाचा, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल)

ट्विट

दरम्यान, वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शालिनी शर्मा माहिती देत असताना आमदार अबू आझमी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी शर्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शिवाय त्यांनी मजूरांसमोर भाषणही केले. ते भाषण करत असताना मजुरांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजीही केली. या सर्व प्रकारादरम्यान आमदार अबू आजमी यांनी मास्कही वापरला नव्हता. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.