Coronavirus: कोरोना व्हायरस संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी 'हा' उपाय प्रभावी ठरु शकतो; मुंबई महापालिकेने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला व्हिडिओ
COVID-19 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिकेने (BMC) कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक अभिनव प्रयोग केला आहे. In Light of COVID-19 असे म्हणत मुंबई महापालिकेने अशा काही उपकरणांना प्राधन्य दिले आहे की, दैनंदिन गरजेच्या वस्तू, सेवा वापरताना, त्या सुरु करताना हाताचा कमीत कमी वापर होईल. जसे की उद्वाहन (लिफ्ट), वॉश बेसीन आदी ठिकाणी तुम्हाला हाता ऐवजी पाय वापरला तरीही तुमचे काम होऊ शकते.

होय, मुंबई महापालिकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेने आपल्या ट्वटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओत अशा काही सेवा आणि कामे दाखवण्यात आली आहेत की जी तुमच्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाची असतात. उदा. उद्वाहन (लिफ्ट) वापरता आपण नेहमी आपणास ज्या मजल्यावर जायचे त्या मजल्याचे बटन दाबतो. इथे हाताचा वापर करावा लागतो. मात्र, पालिकेने शेअर केलेल्य व्हिडिओत हेच काम तुम्हाला पायाने करायचे आहे. तुम्हाला हव्या त्या मजल्याचा नंबर तुम्ही पायात असलेल्या बटनांवनुसार दाबायचा. उद्वाहन तुम्हाला तुमच्या इच्छित मजल्यावर घेऊन जाईन. (हेही वाचा, मुंबई: अंधेरीतील शिवाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने Mission Zero Rapid Action Plan लॉन्च)

WarAgainstCorona या हॅशटॅगसोबत पालिकेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पालिकेने शेअर केलेल्य व्हिडिओप्रमाणे जर सेवा मीळाल्या किंवा नागरिकांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर, कोरोना व्हायरस संक्रमनाला अनेक पटींनी आळा बसण्याची शक्यता आहे. पालिकेने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन @mybmcWardGS आणि @mybmc या ट्विटर अकाऊंटला टॅग केले आहेत.