विधानसभा अध्यक्ष (Maharashtra Assembly Speaker) नाना पटोले (Nana Patole) यांचा स्वीय सहाय्यक (Personal Assistant) कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित झाला असल्याचे वृत्त आहे. नुकतीच त्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर पटोले यांचे कार्यालय निर्जंतूकीकरण करण्यात आले. तसेच, स्वीय सहाय्यकाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तिंची कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार असल्याचे समजते. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधवेशन येत्या 3 ऑगस्टपासून सुरु करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारीही सुरु आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका असल्याने आगोदरच हे अधिवेशन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता ते अधिक लांबणीवर पडू नये. तसेच, राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय मंजूर केल जावेत यासाठी अधिवेशन शक्य तितक्या लवकर घ्यवाे यासाठी सरकार हालचाली करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कशा प्रकारे हे अधिवेशन घेता येईल याबाबत विचारविनिमय सुरु आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकास कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वृत्त धडकले आहे.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशनही लांबणीवर पडले आहे. प्रदीर्घ काळापासून संसतेचे कामकाजही स्थगित करत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृहं सध्या ठप्प आहे. (हेही वाचा, Coronavirus in Thane Jail: ठाणे कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यासह 20 कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण; महाराष्ट्रातील तुरुंगात आतापर्यंत 800 जण संक्रमित)
दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर आज राज्यसभेचे कामकाज सुरु झाले. राज्यसभेवरील रिक्त जागांसाठी 62 सदस्यांची नियुक्त झाली. यातील अनेक सदस्यांनी आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. यात शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस(, उदयनराजे भोसले (भाजप), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), डॉ. भागवत कराड (भाजप), राजीव सातव (काँग्रेस) आदी खासदारांचा समावेश आहे.