Coronavirus: सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचा कोरोना व्हायरस विरुद्ध लढताना मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख (ASI Tajuddin Rahiman Sheikh) यांचे कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे निधन झाले आहे. ताजुद्दीन रहिमान शेख (Tajuddin Rahiman Sheikh) हे सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन (Solapur MIDC Police Station) येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच शेख यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोलापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 175 इतकी आहे. त्यातील 22 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाल्याची सरकारी माहिती आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचा कोरोना विरुद्ध लढताना दुःखद मृत्यू झाला. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत''.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांतील सुमारे 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. त्यापैकी 8 अधिकारी आणि 27 पोलीस कर्माचारी अशा एकूण 35 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 5 पोलिसांना कोरोना व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. (हेही वाचा, Coronavirus: पुणे शहरात कोरोना विषाणूचा कहर; गेल्या 24 तासात आणखी 99 रुग्णांची नोंद तर, 7 जणांचा मृत्यू)

महाराष्ट्र पोलीस ट्विट

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने पाच पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.