Coronavirus: पुणे येथील सफाई कर्मचाऱ्यांना खाणे आणि सॅनिटायझरचे वाटप
Distributes food & sanitizers to sanitation workers in Pune (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे `नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पुढील 21 दिवस लॉकडाउनची परिस्थिती कायम राहणार आहे. तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर ठिकठिकाणी निर्तुंजीकरण करण्यास सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. तर पुण्यात एका व्यक्तीकडून सफाई कर्मचाऱ्यांना खाणे आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

दर्शन घोष असे व्यक्तीचे नाव असून त्याने सफाई कामगारांना खाणे आणि सॅनिटायझरचे वाटप केले आहे. त्यावर घोष असे सांगितले की, आम्ही अशा लोकांची काळजी घेत आहोत जे आपल्या देशाची काळजी घेण्यासाठी कार्य करत आहेत. त्यामुळेच आपण घरात सुखरुप रहावे यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत.राज्यात संचारबंदी आणि जिल्ह्याच्या सीमा बंदचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून पोकळ बांबूचे फटके सुद्धा दिले जात आहेत.(Coronavirus: लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिकांनी राज्यात लष्कराची मदत घेण्याची वेळ आणू नका, अजित पवार यांचा इशारा)

तर मुंबईत आज एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ही वृद्ध महिला कोरोना व्हायरस बाधित असली तरीही तिचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे जीवघेण्या होत चाललेल्या कोव्हिड 19 या आजारामुळेच झाला आहे की नाही याची तपसणी डॉक्टरांकडून केली जात आहे. लवकरच त्यांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट केले जाईल. जगभरात कोरोना व्हायरस रोगप्रतिकारक शक्ती कमी असणार्‍यांसाठी जास्त धोकादायक आहे. त्यामुळे 60 वर्षांवरील आणि लहान मुलांना जपण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.