Coronavirus: मुंबईतील 88 हॉटेल्समधील 3,343 खोल्या परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या क्वारंटाइनसाठी राखीव, बीएमसीची माहिती
Representational Image | (Photo Credits: Twitter/@AUThackeray)

लॉकडाउनमुळे (Lockdown) जगभरात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने (Indian Government) मोहीम सुरु केली आहे. याच्या अंतर्गत 7 विक्रमातून तब्बल 1900 यात्री मुंबईत दाखल होती. ज्यातील मुंबई बाहेरील प्रवाश्यांना तपासणी करून त्यांच्या मूळ गावी पोहचवले जाईल. तर मुंबईतील (Mumbai) नागरिकांना 14 दिवस निगराणीत क्वारंटाइनमध्ये ठेवले जाईल. आणि यासाठी मुंबई महानगर पालिका सज्ज आहे. बीएमसीने शहरातील 88 हॉटेल्समध्ये तब्बल 3,343 खोल्या या यात्रेकरूंच्या क्वारंटाइनसाठी राखीव ठेवल्या आहेत. 7 मेपासून ब्रिटन, अमेरिका, बांग्लादेश, फिलिपिन्स, सिंगापूर आणि मलेशिया येथील भारतीयांना मुंबईत परत आणले जाण्याची शक्यता आहे, असे बीएमसीने म्हटले. पीटीआयमध्ये दिलेल्या माहितीनुसार बीएमसीने दोन, तीन-, चार- आणि पंचतारांकित हॉटेल्स तसेच अपार्टमेंट हॉटेल आणि ओवायओ हॉटेल्समध्ये खोल्या आरक्षित ठेवल्या आहेत. (परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; 'इथे' ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन!)

बीएमसीचे प्रवक्ते विजय खानके म्हणाले, “मुंबईत परत आलेल्या भारतीयांना हॉटेलांमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात येईल आणि अलग ठेवण्याच्या कालावधीनंतर कोरोना व्हायरसची लागण झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल.” हॉटेल्समध्ये 14 दिवसानंतर कोरोना संक्रमित नसल्याचे आढळून आल्यावर प्रवाश्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येईल, पण तेथे देखील त्यांना अलगावात राहावे लागणार आहे.

परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणताना सोशल डिस्टंसिंगचेही कठोरपणे पालन केले जाईल आणि या विशेष उड्डाणांमध्ये केवळ 200 ते 300 प्रवाशांना बसण्याची परवानगी असल्याचे समोर आले आहे. एअर इंडियाने भारताबाहेर जाण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत चालविलेल्या फ्लाइटवर प्रवाशांचे बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान आज देण्यात माहितीनुसार, 64  विशेष विमानांपैकी युएई मध्ये 10, कतार मध्ये 2 सौदी अरेबिया मध्ये 5, युके मध्ये 7, सिंगापूरमध्ये 5,  अमेरिकेमध्ये 7, फिलिपाईंसमध्ये 5, बांग्लादेशमध्ये 7, बहरिनमध्ये 2, मलेशियामध्ये 7, कुवेतमध्ये 5,ओमानमध्ये 2 विशेष विमानं भारतीयांच्या सुटकेसाठी पाठवली जाणार आहेत.