महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा असून दिवसेंदिवस त्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत. मात्र तरीही लॉकडाउनच्या आदेशाचे मुंबईसह बऱ्याच ठिकाणी काटेकोरपणे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत चालला आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1300 च्या पार गेला आहे. तर आता मुंबईत 212 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 993 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य असल्याची सुचना लागू केली आहे. मुंबईतील ज्या परिसरात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी सील करण्यात आले आहे. तर आता मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या पार गेला आहे.(Coronavirus: ठाणे शहरातील 15 परिसर कोरोना व्हायरसचे 'Containment Zones' म्हणून घोषित; जाणून घ्या यादी)
212 persons test positive for coronavirus in Mumbai, taking tally of cases in city to 993: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2020
दरम्यान, मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे मुश्किल होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना शाळांमध्ये हलवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कोरोनाच्या काळात राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे नियम अधिक कठोर होणार असून नागरिकांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.