Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय जाहिर केला आहे. मुंबई, पुणे या सारख्या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने नागरिकांनी त्याबाबध गांभीर्याने वागावे अशा सुचना सुद्धा दिल्या जात आहेत. लॉकडाउन जरी वाढवला असला तरीही शेतीसंबंधित कामे सुरु राहणार आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबईत आज कोरोनाचे नवे 189 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे फक्त मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 1182 वर पोहचला आहे. मुंबई शहराची आकडेवारी ही देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा सर्वाधिक आहे.

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असले तरीही लॉकडाउनच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबाजवणी नागरिकांकडून करण्यात येत नाही आहे. त्यामुळे पोलिसांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई करावी लागत आहेत. तर मुंबईत बहुतांश ठिकाणी दाटीवाटीने लोक राहत असल्याने सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पाळणे मुश्किल होत असल्याने या परिसरातील नागरिकांना शाळांमध्ये हलवण्यात येणार आहे. तर आता मुंबईत आजच्या दिवसभरात नवे 189 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1182 वर पोहचला आहे. तसेच 11 जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील एकूण मृतांचा आकडा 75 वर पोहचला आहे. 11 पैकी 10 ज्या जणांचा मृत्यू झाला आहे त्यांचे कारण हे मुख्यत्वे त्यांचे वय असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Maharashtra Lockdown Extended: महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)

दरम्यान, कोरोनापासून बचाव करायचा असेल तर घरीच थांबा. त्याचसोबत 60 वर्षावरील नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांची घरातील सदस्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच मधुमेह, दमा आणि श्वसनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांनी सुद्धा कोरोनाच्या काळात अधिक काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.