Watch Video: 'देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग हा 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे वाढला'; मंत्री Nawab Malik यांचे प्रत्युत्तर  
Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसपक्षासोबत महाराष्ट्र सरकारवरही टीका केली. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारने मुद्दाम कामगारांना घरी पाठवले व त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला, असे पंतप्रधान म्हणाले. आता पंतप्रधानांच्या या टीकेला महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पहिल्या कोविड-19 लाटेत काँग्रेसने स्थलांतरित कामगारांना मुंबई सोडण्यासाठी मोफत रेल्वे तिकीट दिल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला विरोध करताना, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्वांना थाळी वाजवण्यास सांगितले तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने स्थलांतरितांना अन्न, पाणी आणि मोफत तिकिटे दिली.

नवाब मलिक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी सर्वांना थाळी वाजवायला लावले, कोणत्याही नियोजनाशिवाय कोविड-19 लॉकडाऊन लागू केले, ज्यामुळे कोट्यवधी स्थलांतरित कामगारांवर परिणाम झाला. महाराष्ट्र सरकारने स्थलांतरित मजुरांना सर्व सुविधा दिल्या. मोफत जेवण, पाणी तिकीट दिले. तुम्ही ट्रेन चालवल्या परंतु आम्ही मोफत तिकीटे दिली. राज्य सरकारने या मजुरांसाठी बसेसचीही व्यवस्था केली. आम्ही गरीब आणि असुरक्षितांच्या पाठीशी उभे राहिलो.’

नवाब मलिक पुढे म्हणाले, ‘देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग हा 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे वाढला. दुसरीकडे, पीएम मोदी यांच्या टीकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले की, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला पंतप्रधानांनी लक्ष्य केले हे दुःखदायक आहे. (हेही वाचा: शरद पवार यांच्याकडून मिळते प्रेरणा, नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुकोद्गार; काँग्रेसवर टीकास्त्र)

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ‘भारतीय जनता पक्षाचे खासदार हरीश द्विवेदी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत केलेल्या भाषणात, केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ट्रेन चालवल्याचे अभिमानाने सांगितलं होते. मग पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात फक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाबबद्दलच का बोलत आहेत? चीन, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर मोदी बोलतील अशी अपेक्षा असताना पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला हे पाहून मला वाईट वाटले.’सुपृया

सुळे यांनी दावा केला की, भारतीय रेल्वेच्या आकडेवारीत असे आढळून आले आहे की गुजरातमधून परप्रांतीयांसाठी 1033 ट्रेन धावल्या, तर महाराष्ट्रातून केवळ 817 चालवल्या गेल्या.