Corona Update: मुंबईत 5 तर, वाशी येथे आढळला 1 रुग्ण; महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या 153 वर
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

राज्यात (Maharashtra) कोरोनाबाधीत रुग्णाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणुवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असताना राज्यात पाठोपाठ कोरोनाबाधीत रुग्ण आढळू लागले आहेत. यातच मुंबईत (Mumbai) 5 तर, वाशी (Vashi) येथे 1 नवा रुग्ण आढळला आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 153 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सुरुवातीला जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसाकरिता संचारबंदी घोषीत केली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महत्वाची भुमिका बजावत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूपासून राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले आहेत. दरम्यान, 'खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये', असे आवाहन नुकतेच उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 'खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात', त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाने सुरु ठेवावे असे ते म्हणाले होते. हे देखील वाचा- 'जिंदगी मौत ना बन जाए' गाणं गात पोलिस कॉन्स्टेबल ने नागरिकांना केलं घराबाहेर न पडण्याचं आवाहन; पहा व्हिडिओ

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत एकूण 724 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यात 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यापैंकी 45 नागरिक बरे झाल्याचेही सांगितले जात आहे.