Ulhasnagar: उल्हासनगर येथील बालसुधारगृहातील 14 मुलांना कोरोनाचा संसर्ग

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट झाली असताना उल्हासनगर (Ulhasnagar) येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उल्हासनगर येथील बालसुधारगृहात (Juvenile Detention Center) शिक्षा भोगत असलेल्या 14 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या घटनेनंतर बालसुधारगृहात एकच खळबळ माजली आहे. यामध्ये 4 मुले अपंग आहेत. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुले कोरोना बाधित आढळली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यातच उल्हासनगर येथील बालसुधारगृहातील 14 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित सर्व कोरोनाबाधित मुलांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुले 12 ते 17 वयोगटातील आहे, अशी माहिती बालसुधारगृह प्रशासनाने दिली आहे. हे देखील वाचा- Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आजही कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार; 5 रुग्णांनी गमावला जीव

बालसुधारगृहातील मुलांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बाल सुधारगृहातील कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप आले नसल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणावर मोठा ताण आला होता. दरम्यान, तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांनादेखील कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाच्या काळात अनेक कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन घरी पाठवण्यात आले होते.