Cordelia Cruises Drugs Party Case: मोहित कंबोज यांनी फेटाळले नवाब मलिकांनी केलेले आरोप

मोहित कंबोज मुंबईत आपली 12 हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडेंची घेतो या मलिकांच्या दाव्यालाही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Cordelia Cruises Drugs Party Case: मोहित कंबोज यांनी फेटाळले नवाब मलिकांनी केलेले आरोप
Mohit Kamboj | Twitter/ ANI

आर्यन खान ड्र्ग्स केस मध्ये मोहित कंबोज हा मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक आरोप आज (7 नोव्हेंबर) मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एकमेकांना मदत करत खंडणी वसूली साठी सारा खेळ मांडल्याचं नवाब मलिक यांनी म्हटल्यानंतर आज त्यांच्या आरोपांना फेटाळत लावत मोहित कंबोज यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिकांच्या मते मी मास्टरमाईंड आहे मग हे सांगायला महिना का लागला? असा सवाल विचारत चौकश्या, केस यांना मी घाच्या दाव्यालाही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Cordelia Cruises Drugs Party Case: मोहित कंबोज यांनी फेटाळले नवाब मलिकांनी केलेले आरोप
Mohit Kamboj | Twitter/ ANI

आर्यन खान ड्र्ग्स केस मध्ये मोहित कंबोज हा मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक आरोप आज (7 नोव्हेंबर) मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एकमेकांना मदत करत खंडणी वसूली साठी सारा खेळ मांडल्याचं नवाब मलिक यांनी म्हटल्यानंतर आज त्यांच्या आरोपांना फेटाळत लावत मोहित कंबोज यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिकांच्या मते मी मास्टरमाईंड आहे मग हे सांगायला महिना का लागला? असा सवाल विचारत चौकश्या, केस यांना मी घाबरत नसल्याचं मोहित कंबोज यांनी स्पष्ट केलं आहे. नक्की वाचा:  Cordelia Cruises Drugs Party : 'उडता पंजाब' प्रमाणे 'उडता महाराष्ट्र' करण्याचा होता डाव, पार्टीत सहभागी होण्यासाठी मंत्री Aslam Shaikh यांनाही आग्रह; मंत्री नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट.

मोहित  कंबोज यांनी 'मी माझ्या पत्रकार परिषदा आणि माझी लढाई भाजप पक्षाकडून नाही तर वैयक्तिक स्तरावरुन घेत आहे. 350 कोटीची संपत्ती मी जाहीर केली आहे. 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप फेटाळताना त्यांनी पुरावे घेऊन या असं आव्हान देखील केलं आहे. मी ललित हॉटेल ला गेलो होतो का याबाबत सीसीटीव्ही चेक करा. ' असे म्हटलं आहे.

मोहित कंबोज मुंबईत आपली 12 हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडेंची घेतो या मलिकांच्या दाव्यालाही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. त्यामुळे नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींशी ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सांगावे असेही म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच क्रुझ ड्र्ग्स प्रकरणामध्ये नवाब मलिकांनी दिवाळीनंतर मोठे बॉम्ब फूटणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठे खुलासे केले आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel