Amit Shah On Cooperative Sector: सहकार अभ्यासासाठी विद्यापीठ उभारणार; केंद्रीय मंत्री अमित शाह यांची माहिती
Amit Shah | (Photo Credit - Twitter/ANI)

सहकारी क्षेत्र (Cooperative Sector) अधिक वाढवायचे आणि भक्कम करायचे असतील तर पुढील 25 वर्षांचा विचार करुन भक्कम योजना तयार करायला हवी. त्यासाठी आगामी काळात महाविद्यालयांसह एक विद्यापीठ स्थापण करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री (Union Home & Cooperation Minister अमित शाह (Amit Shah) यांनी दिली आहे. ते पुणे (Pune) येथे VAMNICOM च्या दिक्षांत कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (19 डिसेंबर) ते पुणे येथे आहेत. पुण्यातील प्रसिद्ध दगडू शेठ गणपतीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ केला. तसेच, भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले.

सहकार या विषयावर केंद्र सरकार अधिक गांभीर्याने विचार करते आहे. सहकार हा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी एक निश्चित योजना तयार करुन आगामी काळात एक धोरण जाही केले जाईल. हे धोरण पुढील 25 वर्षांचा विचार करुन आखले जाईल, असेही शाह म्हणाले. (हेही वाचा, Amit Shah Pune Tour: पुण्यात सहकार क्षेत्रासाठी भारतातील पहिले विद्यापीठ तयार होण्याची शक्यता, अमित शाहांकडे केली मागणी)

ट्विट

देशभरातील विविध ठिकाणी लवकरच महाविद्यालयांसह सहकार या विषयावर एक विद्यापीठ स्थापन करु, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमित शाह यांनी काल (18 डिसेंबर) अहमदनगर येथील प्रवरागनर येथील सहकार परिषदेस उपस्थिती लावली. तेथेही त्यांनी सहकार विषयावर केंद्र सरकारची भूमिका व्यक्त केली.