1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि इंडियन मुजाहुद्दीन या दहशतवादी संघटनेचा जलिस अंसारी (Jalees Ansari) म्हणजेच ‘डॉ.बॉम्ब’ (Dr Bomb) मुंबईमधून बेपत्ता झाल्याची तक्रार आज (17 जानेवारी) नोंदवण्यात आली आहे. दरम्यान अंसारी हा पॅरोलवर तुरूंगाच्या बाहेर होता आणि आज त्याला अजमेर तुरूंगामध्ये हजर राहणे अपेक्षित होते. मात्र काल (16 जानेवारी) पासून अंसारी बेपत्ता असल्याने मुंबई गुन्हे शाखा आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जलीस अंसारीचे नाव मुंबई बॉम्बस्फोटाप्रमाणेच इतर 50 बॉम्बस्फोटांमध्ये जोडले होते. यापैकी 6 बॉम्बस्फोटांचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. दरम्यान अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जलील अंसारी 68 वर्षीय असून ते 21 दिवसांच्या पॅरोलवर होते. राजस्थानमधील अजमेर येथील सेंट्रल जेलमधून जलील अंसारी बाहेर आले होते. पॅरोलच्या मुदतीमध्ये अंसारीला रोज सकाळी साडे दहा ते 12 च्या वेळेस आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागत असे. मात्र काल दिलेल्या वेळेत अंसारी दाखल न झाल्याने पोलिसांनी दुपारी त्याचा 35 वर्षीय मुलगा जैद अंसारी पोलिस स्टेशनमध्ये पोहचला त्यानंतर त्याच्याकडून वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळला; जम्मू-काश्मीर पोलिसांकडून 5 दहशवाद्यांना अटक.
मुंबईमध्ये आग्रिपाडा पोलिस स्थानकात अंसारी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान काल (17 जानेवारी) जम्मू कश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा 26 जानेवारीला दहशतवादी कट उधळण्यात आल्याचं वृत्त देण्यात आलं आहे. या दिवसाचं औचित्य साधत देशभरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.