Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai Cop Dies of Heart Attack: मुंबई ते शिर्डी 240 किमी पदयात्रेत (Padayatra From Mumbai To Shirdi) सहभागी झालेल्या एका पोलिस सहाय्यक हवालदाराचा (Police Assistant Constable) बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. प्रफुल्ल सुर्वे असं या मृत पोलिसाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल सुर्वे हे मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. सुर्वे त्यांच्या गंतव्यस्थानापासून फक्त 10 किमी अंतरावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी सुर्वे यांनी 230 किलोमीटर अंतर पायी कापले होते.

साई पालखी मंडळ आणि पोलिस विभागाने व्यक्त केला शोक -

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या पदयात्रेत अनेक भाविक सहभागी होत असतात. या घटनेमुळे संपूर्ण पदयात्रेतील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच साई पालखी मंडळ आणि पोलिस विभागाने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. (हेही वाचा -Wrestler Dies of Heart Attack: वडिलांचं स्पप्न भंगलं! साताऱ्यातील 14 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)

 

अहमदाबादमध्ये 8 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू -

शुक्रवारी सकाळी अहमदाबादच्या थलतेज परिसरातील झेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये 8 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गार्गी, असं या मुलीचं नाव होतं. तिसरीत शिकणारी गार्गी छातीत दुखत असल्याची तक्रार करत शाळेत आली. तसेच त्यानंतर खुर्चीवरून खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Heart Attack While Playing Cricket: षटकार ठोकताच हृदयविकाराचा झटका, जालना येथे क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू (VIDEO))

शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गार्गीला अस्वस्थ वाटत असल्याचे दिसून येते आहे. तिची प्रकृती बिघडल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णवाहिका बोलावून प्राथमिक उपचार केले. परंतु, तिला मृत घोषित करण्यात आले. गार्गीला सर्दी आणि खोकला यासारख्या सामान्य बालपणीच्या आजारांशिवाय पूर्वी कोणताही आरोग्य समस्या नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.