Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

मुंबई मेट्रो कारशेडच्या (Mumbai Metro Car Shade) आरे जंगलात सुरु असलेलं कामाविरोधात आज महाराष्ट्र कॉंग्रेस (Maharashtra Congress) आक्रमक भुमिकेत दिसून येणार आहे. कारशेडला (Car Shade) विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेस (Congress) कडून थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) निवासस्थाना  बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांबरोबर पर्यावरण प्रेमीदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. तरी सुरक्षिततेच्या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील (Thane) लुईसवाडीतील घरासमोर पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) असताना 808 एकर (Acres) जंगलक्षेत्र घोषित करत कारशेड कांजूरमार्गला (Kanjurmarg) स्थलांतरीत करण्यचा निर्णय घेण्यात आला होता.मुंबईतील (Mumbai) मेट्रो कारशेडच्या (Metro Car shed)  स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच ( R A Forest) बनवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government)  सरकारने घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे. पर्यावरण वाद्याच्या या विरोधास पाठींबा दर्शवत कॉंग्रेस आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थाना  बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: 'फडणवीस बाळासाहेबांच्या नावाने मते मागत आहेत, हे मोदी युग संपल्याचे लक्षण', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपचे प्रतिउत्तर)

 

यापूर्वी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), मनेसेचे सर्वोसर्वा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) तसेच दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टी (AAP) या पक्षांनी देखील आरेतील मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला होता. तसेच गेल्या काही रविवारपासून या संबंधी पर्यावरण प्रेमींकडून दर रविवार आंदोलन केल्या जात आहे. तरी आज कॉंग्रेस कडून करण्यात येणार असणाऱ्या या आंदोलनाचा मेट्रो कारशेड बाबतच्या निर्णयावर काय परिणाम होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.