Former Chief Minister Devendra | (Photo Credits: Twitter/ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे वादग्रस्त विधानांमुळे बरेच चर्चेत आहे. 15 जानेवारीला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात गुंड करीम लाला यांच्या भेटीबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून नाराजीचा सूर उमटत आहे शिवाय विरोधकही पेटून उठले आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड बद्दल कनेक्शनबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.

'मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या,' असं वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाहा ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा- पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता- निलेश राणे

हे विधान खूपच धक्कादायक असून लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे या विधानावर काँग्रेस नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर दुसरीकडे हे विधान करणारे संजय राऊत मात्र 'इंदिरा गांधी यांच्याबद्दल आम्हाला कायमच आदर आहे. नेहरू, इंदिरा, राजीव गांधी यांच्यावर जेव्हा-केव्हा टीका झाली, त्यावेळी आम्ही त्यांचं समर्थन करण्याची भूमिका घेतली. काँग्रेसवाले गप्प असतानाही आम्ही गांधी घराण्याचं समर्थन करायचो,' असं सांगितले आहे.