Sanjay Raut and Nilesh Rane (Photo Credits: Facebook)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अलीकडेच दाऊदविषयी एक खळबळजनक खुलासा केला होता. ज्यात त्यांनी 'मी दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलोय आणि त्याला दम भरला आहे' असे वक्तव्य केले होते. यावर विरोधकांनी खोचक शब्दांत टिका करायला सुरुवात केली. यात भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही संजय राऊतांवर टिकास्त्र सोडत "संज्या राऊत पिसाळलेला कुत्रा आहे", अशा शब्दांत टिका केली आहे. संजय राऊतांच्या आक्षेपार्ह विधानावर सर्वच स्तरांतून विरोध होत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये निलेश राणेंनी संजय राऊत यांची तुलना थेट पिसाळलेल्या कुत्र्याशी केली आहे.

पाहा निलेश राणें चे ट्विट:

हेदेखील वाचा- लोक मला गुंड म्हणायचे, मी दाऊद इब्राहिम यालाही दम दिला आहे: संजय राऊत

'' मी खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्यासारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर'', असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

निलेश राणे यांच्या ट्विटमुळे शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अनेक गौप्यस्फोट केले.

या मुलाखतीत त्यांनी पत्रकारितेतील कारकिर्दीबद्दल सांगताना संजय राऊत यांनी दाऊदचा उल्लेख केला होता. 'मी दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊदला दम देखील दिलाय', असं राऊत म्हणाले होते.