अमरावती: काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची सरकारी अधिकाऱ्याला शिविगाळ
Congress MLA Yashomati Thakur | (Photo credits: Facebook)

Amravati: काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Congress MLA Yashomati Thakur) यांनी सरकारी अधिकाऱ्याला शिविगाळ केल्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. जलसंपादा विभागाने आदेश देऊनही पाणी न सोडल्याने जाब विचारण्यासाठी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर सिंचन विभाग कार्यालयात पोहोचल्या होत्या. दरम्यान, पाण्याचा विषय काढताच सरकारी अधिकारी रवींद्र लांडेकर हे गालात हसत असल्याचे आमदार ठाकूर यांनी पाहिले. ते पाहून यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. त्यांनी आपल्या खास इंग्रजीत अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. तसेच, या अधिकाऱ्याला शिविगाळही केली.

आमदार यशोमती ठाकूर अधिकाऱ्याला शिविगाळ करत असताना त्यांच्यासोबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि अतूल लोंढे हे देखील होते. तिवसा धरणातील पाणी सोडावे अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती. मात्र, जलसंपदा विभागाने आदेश दिले तरीही सिंचन विभागाने पाणी सोडले नाही. त्यामुळे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर,आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री रणजित कांबळे,काँग्रेस जिल्हाधक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी यशोमती ठाकूर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.तिवसा विधानसभा मतदारसंघातील तुळजापूर, राजूरवाडी, निंभाणी, शिरूळ, दापोरी आदी गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती प्रचंड आहे. या ठिकाणी एक दोन नव्हे तर १० दिवसांनी पाणी येते. त्यामुळे इथले नागरिक नाराज आहेत. या नागरिकांना पाणी मिळवे अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली होती. (हेही वाचा, नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे 300 लीटर पाण्यावर डल्ला; अज्ञात पाणीचोरांवर गुन्हा दाखल)

आमदार यशोमती ठाकूर यांचा एनएआयने ट्विट केलेला व्हिडिओ

तिवसा तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर,आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री रणजित कांबळे,काँग्रेस जिल्हाधक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन केलं. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अभियंत्याला अपशब्द वापरले. त्यांचा संताप आणि रौद्र रूप पाहत प्रशासनाने अप्पर वर्धा धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय मागे घेतला. तातडीने तिवसा तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आलं.

दरम्यान, जलसंपदाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांचे राजकीय लागेबांदे आहेत. ते भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळेच त्यांनी तिवसा धरणाती पाणी सोडण्यास टाळाटाळ केली, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.