नुकतीच पार पललेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय वातावरण तापले. या निवडणुकीत भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) महायुतीने अधिक जागा मिळवून अजूनही राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आहे. तसेच राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. यातच शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस (Congress) आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढवला आहे. जयपूर येथे एका हॉटेलमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. त्यावेळी काँग्रेसचे नेते मिल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), पृथ्वीराज चव्हान (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (BalaSaheb Thorat) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजत आहे.
विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, राज्यात भापजची सत्ता स्थापनाची तयारी आहे का? असे राज्यापालांनकडून पत्राच्या माध्यमातून विचारणा करण्यात आली आहे. राज्यपालांच्या पाठलेल्या पत्रानंतर राजकीय हालचालींनी चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी काँग्रेसच्या आमदारांकडून काँग्रेसच्या नेत्यांवर दबाब टाकायला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, 40 आमदारांनी एकमतांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी बाहेरुन पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- भाजप-शिवसेना सरकार बनवत नसेल तर, काँग्रेस-राष्ट्रवादी पर्यायी सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्न करेल- नवाब मलिक
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे. यात पुढील सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे.