Nana Patole Statement: 'अरे भाई गुस्से की बात नही', मला निमंत्रणच नव्हतं; शरद पवार, एके पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या भेटीवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया
Nana Patole | (Photo Credit : Facebook)

काँग्रेस (Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे. काँग्रेस पक्षासोबत 2014 मध्ये मोठा धोका झाला आहे. त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (Congress NCP) पक्षाची आघाडी तुटली होती अशी आठवण करुन देत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाबाबत विधान केले आहे. तसेच, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी ए के पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीवरुनही नाना पटोलो यांनी वेगळे विधान केले आहे. नुकत्याच झालेल्या या भेटीला नाना पटोले उपस्थित नव्हते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता 'अरे भाई गुस्से की बात नही' त्या भेटीचे मला निमंत्रणच नव्हते असे पटोले यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना विचारले तर ते म्हणाले आमच्यात ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली. त्यामुळे माझा कोणावर राग वैगेरे नाही. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मी माझ्या पक्षाचं काम करत आहे. माझ्या पक्षाचं काम करताना जर कोणाला माझा राग येत असेल तर मला काहीही अडचण नाही. मी काम करतच राहणार, असे पटोले यांनी सांगितले. दरम्यान, आगामी काळात आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करतो आहे. या आधी काँग्रेस सोबत धोका झाल्याचेही पटोले म्हणाले. (हेही वाचा, Shiv Sena on Nana Patole and Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्या बागडण्याचे महाराष्ट्राला जे कौतुक तेच नाना पटोले यांच्या बोलण्याचे- शिवसेना)

महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सध्या तरी महाविकासआघाडी सरकारमध्ये कोणतेही फेरबदल नाहीत. आमच्या पक्षाचे हायकमांड जसे निर्देश देते तसेच आम्ही काम करत असतो. देशात सध्या भाजपला एकमे पर्याय म्हणजे काँग्रेस अशीच स्थिती आहे. काँग्रेसच भाजपला पर्याय देऊ शकतो. भाजपने आरक्षण संपवलं आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. जर चौकशीच झाली तर देवेंद्र फडणवीसही अडचणीत येतील. फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करणयाचे काम केले. आज देशात जी वित्रिच परिस्थीत आहे. त्याला भाजप सरकारच जबाबदार आहे. त्याविरोधात राज्यपालांना उद्या निवेदन देणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.