Krishna Kumar Pandey | Photo Credit - Twitter

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra ) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते कृष्ण कुमार पांडे (Krishna Kumar Pandey) यांचे मंगळवारी (8 नोव्हेंबर) भारत जोडो यात्रेत सहभागी होत असताना निधन झाले. पांडे हे काँग्रेसच्या सेवा दलाचे सरचिटणीस होते. जी पक्षाची तळागाळातील आघाडीची संघटना आहे. काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे की, यात्रा सुरु असतानाच कृष्ण कुमार पांडे हे अचानक कोसळले. त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करणयात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

कृष्ण कुमार पांडे यांच्या निधनाबद्दल माहिती देताना काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले की, कृष्णकुमार यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झाले. ते तिरंगा घेऊन चालत होते. त्यांनी आपल्या हातातील तिरंगा दिग्विजय सिंह यांच्याकडे दिला आणि ते नुकतेच मागे सरले होते. त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच त्यांचे निधन झाले. रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा, Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास सुरु, जाणून घ्या राहुल गांधींचा आजचा संपूर्ण कार्यक्रम)

जयराम रमेश ट्विट

जयराम रमेश यांनी पुढे सांगितले की, कृष्ण कुमार हे कट्टर काँग्रेसी होते. ते नागपूरमध्ये आरएसएसला तोंड देत असत. सर्व यात्रेकरूंसाठी हा अत्यंत भावूक क्षण आहे.

राहुल गांधी ट्विट

दरम्यान, भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पांडे यांच्या प्रियजनांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. राहुल गांधी यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस, कृष्णकांत पांडे जी यांचे निधन संपूर्ण काँग्रेस परिवारासाठी अतिशय दु:खद आहे. मी त्यांच्या प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.