Rahul Gandhi (Photo Credits: Facebook)

कन्याकूमारी (Kanyakumari) पासून सुरु झालेले कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता महाराष्ट्रात (Maharashtra) येवून ठेपली आहे. कालचं राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) या यात्रेने नांदेड (Nanded) जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तरी काल भारत जोडो यात्रेच्या पहिल्याचं दिवशी हातात मशाल पकडून राहुल गांधींनी देगलूर (Deglur) येथे दाखल झाली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसकडून (Maharashtra Congress) राहुल गांधीसह (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यातील बड्या कॉंग्रेस नेत्यांपासून ते छोट्या कार्यकर्त्यां पर्यत सगळेचं हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) भारत जोडो यात्रेची जबाबदार अशोकराव चव्हानांकडे (Ashokrao Chavan) देण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), पृश्वीराज चौहान (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासारखे महत्वाचे नेते या यात्रेत विशेष उपस्थिती लावणार आहे.

 

आज राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नांदेडमध्ये (Nanded) आहे. नांदेडमधील गुरुद्वारापासून भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली आहे. त्यानंतर नांदेडहून ही यात्रा अटकाळी गावाच्या दिशेन रवाना होणार असुन या गावाजवळ विश्रांती घेणार आहे. त्यानंतर पदयात्रेला दुपारी ४ वाजता पुन्हा खतगाव फाट्यापासून सुरुवात होईल. पुढे तीन तास पदयात्रेनंतर संध्याकाळी सात वाजता ही यात्रा विश्रांती घेईल. (हे ही वाचा:- Dapoli Resort Fraud Case प्रकरणामध्ये माजी मंत्री Anil Parab यांच्या अडचणींत वाढ; फसवणूकीचा गुन्हा दाखल)

 

पुढील 14 दिवस भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध जिल्ह्यांना भेटी देत काही ठिकाणी राहुल गांधी (Rahul Gandhi) जाहीर सभा घेणार आहेत. कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ऐक्याचे दर्शन बघायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या (BJP) बलाढ्य ताकतीचा सामना करायचा असल्यास कॉंग्रेसच्या (Congress) या भारत जोडो यात्रेचा मार्ग बऱ्याच पक्षाला सोयिस्कर वाटत आहे. तरी राज्यातील कुठले प्रमुख नेते या यात्रेत सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.