Devendra Fadnavis यांचे मानसिक संतुलन बिघडले; काँग्रेस नेते Bhai Jagtap यांची टीका
Devendra Fadnavis, Bhai Jagtap (Photo Credit: PTI/ FB)

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ज्यांनी रात्रीच्या अंधारात आरेतील झाडांची कत्तल केली, ते आज कोकणातील झाडांबाबत चिंता व्यक्त करत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी स्वत:ला तपासून घेतले पाहिजे, असेही भाई जगताप म्हणाले आहेत.

नुकतीच भाई जगताप यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली आहे. दरम्यान, त्यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यावेळी ते म्हणाले की, रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली, ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. "देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. जरा तपासून घ्या स्वत:ला", असे भाई जगताप म्हणाले आहेत. हे देखील वाचा-तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातला फटका बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत पण अन्य राज्यांच्या मदत देऊ न केल्याने रोहित पवार यांची फेसबुक पोस्टद्वारे नाराजी

तसेच तौक्ते चक्रीवादाळात नुकसान झालेल्या नागरिकांचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. "केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. केंद्र सरकारने आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधली आहे. त्यांनी गुजरातला मदत केली, मग इतर राज्यांना का नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही. परंतु, महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्तांना चांगली मदत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

याआधीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारकडे कोकणातील नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. तसेच या वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना केंद्राने मदत नाही केली तर, राज्य सरकारने कोकणवासियांना भरीव मदत करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारला कर्ज घेण्याची गरज पडली तरी घ्या पण नुकसानग्रस्तांना मदत करा, असेही ते म्हणाले आहेत.