Pune: बायडेन ‘भाऊ’ अन् ‘आक्का’ हॅरिस तुमचे अभिनंदन; पुण्यातील पोस्टरबाजी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
Pune Poster (Photo Credit: Twitter)

अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन (Joe Biden) आणि उपाध्यक्षपदी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी शपथ घेतल्यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगभरात उत्साह पाहायला मिळाला आहे. दरम्यान, या दोघांवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भारताचे पंतप्रधान मोदींनीही ट्विटरद्वारे दोघांचे अभिनंदन केले आहे. मात्र, आता पुण्यात जो बायडन आणि कमला हॅरिस यांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स झळकवण्यात आले आहे. या फ्लेक्समध्ये जो बायडेन यांचा उल्लेख चक्क भाऊ आणि कमला हॅरिस यांचा उल्लेख आक्का असा करण्यात आला आहे. या फ्लेक्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.अमेरिकेच्या सत्ताकारणात बायडन पर्वाला सुरुवात झाली आहे. याचबरोबर नवा इतिहासही रचला गेला आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, या पदावरील त्या आफ्रिकन आणि आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. हे देखील वाचा- शिवप्रेमींचा विजय! संभाजी बिडी चे झाले नामांतरण, 'साबळे बिडी' म्हणून होणार विक्री

ट्वीट-

ट्वीट-

ट्वीट-

याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘डोनाल्ड तात्या ट्रम्प’ असा सोशल मीडियावर भारतीय ट्रोलर्सकडून उल्लेख होत असे. ट्रम्प तात्या अशा नावाने सोशल मीडियावर मीम्स, व्हिडीओही शेअर केले जातात. ट्रम्प यांना मराठी डबिंग करुन भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.