थंडीची हुडहुडी 4 जानेवारीपर्यंत जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

हवामान खात्याने विविध राज्यातील थंडीच्या दिवासांचे अंदाज वेळापत्रक वर्तविले आहे. तर थंडीची हुडहुडी येत्या 4 जानेवारी, 2019 पर्यंत कायम राहणार आहे.

नागपूर, गोंदिया येथे मोठ्या प्रमाणात थंडी पडली असून तेथील तापमानाने 5.2 अंश निचांक गाठला होता. तर 7 अंश तापमानाखालील वातावरण योग्य असल्याचे सांगितले गेले. नागपूरात कमी अंश तापमानाचे मोजमाप केले असता 3.5 अंश तापमान शनिवारी पाहायला मिळाले होते. तर रविवारी या तापमानात 0.5 अंशाने वाढ झाली होती. तसेच रविवारच्या तापमानानुसार, कमीत कमी तापमान 10 अंशापेक्षा कमी तापमान विदर्भात दिसून आले.

प्रादेशिक हवामानशास्र केंद्र (Regional Meteorological Centre) यांनी वर्तविलेल्या तापमानाचा अंदाज  5 ते 10 अंशा पर्यंत राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या हवामानामुळे प्रदेशात कोणताही बदल होईल याची निश्चितता देण्यात आालेली नाही.