CMO Clarification On BMC Defaulter List (Photo Credits: ANI/ Facebook)

कोट्यवधी रुपयांची पाणी बिलं थकीत ठेवल्याच्या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सह 18 मंत्र्यांच्या घरांना डिफॉल्टर यादीत (Defaulter List) समाविष्ट करण्यात आले होते. याबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्टीकरण देत, पाण्याच्या बिलाच्या रक्कमेत तफावत असल्याने बिल भरण्याची प्रक्रिया लांबत असल्याचे म्हंटले आहे. मंत्र्यांना रहिवासासाठी पुरवण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानाचे बिल हे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भरण्यात येते, सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेमध्ये हा व्यवहार मागील अनेक वर्षांपासून सातत्याने चालत आहे.

शासकीय  निवासस्थानामध्ये मंत्री व त्यांच्या कुटुंबाखेरीज सरकारी पाहुण्यांचा ही निवास असतो त्यामुळे बिल थकवल्याचे खापर कोण्या अमुक व्यक्तीच्या माथी टाकणे हे उचित नाही असे देखील या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत, BMC कडे साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं

CMO ट्विट 

ABP च्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2018 पर्यंतची मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या बंगल्यांची पाण्याची बिलं भरलेली आहेत. मात्र जुनी भरलेली बिलं व मे 2019 मध्ये प्राप्त झालेलया बिलांच्या रक्कमेत तफावत आढळून येत आहे त्यामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. याबाबत हिशोब झाल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल अशी सूचना विभागाच्या मुंबई शहर इलाखा विभागाला देण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री निवास स्थानासोबतच सह्याद्री राज्य अतिथीगृहाची पाणी बिलाची थकीत रक्कम नोव्हेंबर पर्यंत पुरवण्यात आली आहे, उर्वरित रक्कम सुद्धा काही काळात भरण्यात येईल असे सांगितले जातेय.

दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपये पाणी बिल थकलं आहे. तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केली तर ती 8 कोटी इतकी आहे.