मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली; 7 मार्च ला घेणार रामलल्लाचे दर्शन
उद्धव ठाकरे अयोध्या दौरा (Photo Credit :Shivsena Facebook page)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याची (Ayodhya Visit)  तारीख आता 7 मार्च अशी निश्चित झाली आहे. अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir)  निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार अशी घोषणा केली होती , मात्र मध्यंतरी महाराष्ट्र सत्ता संघर्ष सुरु असताना ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर पडत होता. यानंतर अलीकडेच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी ठाकरे सरकारचे 100 दिवस पूर्ण होताच अयिध्य दौरा करणार असल्याची माहिती दिली होती. आता या दौऱ्याची निश्चित तारीख ठरली असूज येत्या 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत अयोध्येला जाणार आहेत याबाबात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरद्वारे माहिती दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे. येत्या 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. 7 मार्च रोजी अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा, असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत ट्विट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आज राऊत यांनी लगेचच ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे ट्विट केले आहे. दुसरीकडे अयोध्या राम मंदिराच्या बांधणीच्या दिशेने सुद्धा सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत, एक ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणी लवकरच सुरु होणार आहे याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिली वीट रचली जाण्याची शक्यता आहे.