Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या इतर समस्या यांचा सामना करण्यासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज होती. त्यामुळे मुख्यमंत्री साहाय्यता निधीत (Chief Minister’s Relief Fund) योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला विविध स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता ICICI Venture Funds Management कडून तब्बल 1 कोटींची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दान करण्यात आली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. (कोविड-19 च्या संकटात Patym कडून 3 लाख Hygiene Products ची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार)

CMO Maharashtra या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी ICICI Venture Funds Management आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही दिलेल्या 1 कोटी रुपयांच्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुमच्या योगदानामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला अधिक बळकटी येईल, अशा आशयाचे ट्विट करण्यात आले आहे.

CMO Maharashtra Tweet:

यापूर्वी अनेक मान्यवर, कलाकार यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दान करुन कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आपला सक्रीय सहभाग दर्शवला आहे. तर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला आहे. Hindustan Unilever कंपनीकडून 10 कोटीहून अधिक वैद्यकीय संसाधनांची मदत करण्यात आली. तर Patym कडून 3 लाखांचे Hygiene Products पुरवण्यात आले. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे आभार मानले आहेत.