सलमान खान याने मुंबई पोलिसांना 1 लाख सॅनिटायझरचे वाटप केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार
उद्धव ठाकरे यांनी मानले सलमान खानचे आभार (Photo Credits-Twitter/File Image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अन्य क्षेत्रातील मंडळी सुद्धा आपल्या परीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना मदतीचा हात पुढे करताना दिसून येत आहेत. याच दरम्यान, अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने मुंबई पोलिसांना कोरोनाच्या परिस्थितीत 1 लाख सॅनिटायझरचे वाटप केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सलमान खान याने केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत.

सलमान खान याने काही दिवसांपूर्वी त्याचा फ्रेश (FRESH) ब्रॅन्ड लॉन्च करत असल्याचे घोषित केले होते. त्यामध्ये प्रथम सॅनिटायझर प्रोडक्ट लॉन्च केले असून येत्या काळात आणखी नवे प्रोडक्ट्स सुद्धा उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये बॉडी वाईप्स, डिओ, परफ्युमचाही समावेश असेल अशी माहिती सलमान खानने दिली होती. तर सॅनिटायझर प्रथम लॉन्च करण्यात आल्यानंतर सलमान खान याने त्याचे वाटप मुंबई पोलिसात केले आहे.तर FRESH या बेवसाईटनुसार 100 मिली लीटर असणाऱ्या सॅनिटायझरची किंमत 50 रुपये आणि 500 मिली लीटरसाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच कॉम्बो सेट खरेदी केल्यास ग्राहकांना 10-20 टक्के सूट सुद्धा दिली जाणार असल्याचे बेवसाईटवर सांगण्यात आले आहे.(सलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती महाभंयकर होत चालली आहे. तरीही या काळात वैद्यकिय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु काहींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात सुद्धा केल्याने त्यांचे आनंदात स्वागत करण्यात येत आहे. एकूणच महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 62228 वर पोहचला असून 2098 जणांचा मृत्यू झाला आहे.