सलमान खान कडून मुंबई पोलिसांसाठी FRSH Sanitisers दान; लाखभर बॉटल्सचं वाटप
Salman Khan's FRSH Donated To Police (Photo Credits: Instagram/Twitter)

सलमान खानच्या चाहत्यांना रमजान ईद दिवशी त्याच्या सिनेमाची ट्रीट मिळाली नसली तरीही त्याने काही दिवसांपूर्वी ग्रुमिंग आणि पर्सनल केअर ब्रॅन्ड FRSH लॉन्च केला आहे. यामध्ये त्याने कोरोना व्हायरस संकटाची दहशत पाहता हॅन्ड सॅनिटायाझर लॉन्च केलं आहे. दरम्यान सलमान खानच्या या फ्रेश सॅनिटायझरचं मुंबई पोलिसांना वाटप करण्यात आलं आहे. राज्यात सामान्यांसोबतच पोलिस दलातील कर्मचारी देखील कोव्हीड 19 च्या विळख्यात अडकले आहे. आज सकाळपर्यंत राज्यात 2211 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या कोव्हिड योद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे लाखभर फ्रेश हॅन्ड सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं आहे.

राहुल कनल या युवासेनेच्या कोअर कमिटीपैकी एक असलेल्या सदस्याने सोशल मीडियावर पोलिसांना हॅन्ड सॅनिटायझर वाटल्याचे फोटो शेअर केले आहेत. सलमान खान सोबतच्या Being Haangry या कॅम्पेनमध्ये सहभागी होत हे वाटप करत आहे. सध्या हॅन्ड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूमध्ये करण्यात आला आहे. काळाबाजार रोखण्यासाठी त्याच्या किंमतीदेखील सरकारने निश्चित केल्या आहेत. दरम्यान 100 मिली साठी 50 रूपये तर 500 मिलीसाठी 250 रूपये आकारले जाऊ शकतात. महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ सलमान खान-अक्षय कुमार समवेत 'या' कलाकारांनी बदलला आपला प्रोफाईल फोटो

Rahul N Kanal's Tweet Here:

दरम्यान सलमान खानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेश या ब्रॅन्डची घोषणा करताना काळाजी गरज पाहता आम्ही आधी हॅन्ड सॅनिटायझर घेऊन आलो आहोत मात्र भविष्यात इतर काही प्रोडक्ट्सदेखील लॉन्च होणार आहेत. यामध्ये बॉडी वाईप्स, डिओ, परफ्युमचाही समावेश असेल अशी माहिती सलमान खानने दिली आहे.