मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार (Maha Vikas Aghadi Cabinet Expansion) लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खांदेपालटही पार पडण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमंनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात काँग्रेस (Congress) पक्षातील दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना (Shiv Sena)आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील मंत्रिपदाच्या रिक्त जागा भरली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील विद्यमान मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना कामगिरीच्या आधारावर डच्चू दिला जाऊ शकतो. तसेच त्या जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.
दोन जागा रिक्त
महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातील दोन जागा रिक्त आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना आमदार संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंह यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांना राजीमाना द्यावा लागला. त्यामुळे या दोन जागाही मंत्रिमंडळ विस्तारात भरल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी स्पर्धा आहे. (हेही वाचा, Aashadhi Ekadashi 2021 : मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराची महापूजा संपन्न)
राज्य मंत्रिमंडळ (पक्षनिहाय मंत्रीपदे)
राष्ट्रवादी काँग्रेस- 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं)
शिवसेना- 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं)
काँग्रेस- 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं)
दरम्यान, नव्याने भरल्या जाणाऱ्या जागांसाठी पक्षवाढीसाठी तिन्ही पक्ष पक्षविस्तार या दृष्टीकोनातून पाहण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका आहेत. शिवाय राजयात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिन्ही पक्षाकडून प्रयत्न सुर आहेत. त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी देताना पक्षविस्तारासाठी महत्त्वाचा चेहरा ही देखील बाजू जमेची राहणार आहे.