मुंबईकरांसाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government) नववर्षाचे एक छान गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी चारकोप मेट्रो डेपो येथे मेट्रो 7 आणि मेट्रो 2 A च्या मेट्रो गाड्यांच्या डब्यांचं अनावरण केले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) सह अन्य दिग्गज नेते देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्वयंचलित मेट्रोचे अनावरण करण्यात आले. नवी मेट्रो लवकरच रुळांवरुन मेट्रो 7 आणि मेट्रो 2 A या लाईन येत्या मे पर्यंत जनतेसाठी सुरु करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ट्रॅव्हल कार्ड व ऑपरेशनल कंट्रोल सेंटर, चारकोप आगार व रिसिविंग सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम ‘बीईएमएल’कडे सोपविण्यात आले असून स्वदेशी बनावटीची ही पहिलीच मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे.हेदेखील वाचा- Mumbai Local 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवासासाठी खुली पण केवळ 'या' वेळेत करता येणार प्रवास
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज चारकोप मेट्रो डेपो येथे मेट्रो लाईन ७ आणि २-ए साठी मेट्रोच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मेट्रो कोचचे अनावरण, ट्रॅव्हल कार्ड व ऑपरेशनल कंट्रोल सेंटर, चारकोप आगार व रिसिविंग सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. pic.twitter.com/uIGu9J6JQF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2021
या मेट्रोचे सर्व कोच एसी आहेत. त्यात ऑटोमॅटीक (स्वयंचलित) दरवाजे आहेत. पॅसेंजर अनाऊंसमेंट आणि पॅसेंजर इन्फर्मेशन व्यवस्था कार्यरत आहे. प्रवासी ये-जा करताना घसरून पडू नये यासाठी या डब्यांचा अंतर्गत पृष्ठभाग हा अँटी स्किडींग करण्यात आला आहे. प्रत्येक डब्यात फायर फायटिंग आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आहे. या मेट्रोचा प्रत्येक डब्यात आणि प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्हीची नजर असेल.
प्रवाशांना मदत मागण्यासाठी प्रत्येक डब्यात एक स्विचही देण्यात आला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सध्या सायकल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मेट्रोच्या प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची व्यवस्थासुद्धा आहे. अपंग बांधवांना आपल्या व्हीलचेअरसह प्रवास करता यावा, यासाठी प्रत्येक डब्यात स्वतंत्र व्यवस्था आहे.