मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: PTI

यंदा होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 9 मार्च दिवशी हुताशनी पौर्णिमेदिवशी होळी (Holi) पेटवली जाणार आहे. तर 10 मार्च दिवशी धुळवडीचा (Dhulwad) सण आहे. मात्र जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दहशत असल्याने त्याचं सावट यंदाच्या होळी सेलिब्रेशनवरही आहे. या पार्श्वभूमीवर होळी, धुळवडीचा सण खेळताना काळजी घ्या. अनावश्यक गर्दी टाळा असंदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हटलं आहे. सोबत विनाशी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते. त्यामुळे यंदाच्या होळीमध्येही कोरोना व्हायरसचं संकट जळून खाक व्हावं अशी प्रार्थना आपण करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भारतामध्ये कोरोनाचे 29 रूग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात अद्याप कोरोना व्हायरसचा रूग्ण नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मात्र पुण्यासह महाराष्ट्रात इतर भागातही वेळीच निदान करण्यासाठी लॅब सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा होली मिलन कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्याप्रमाणेच यंदा मुंबईमध्ये मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील होळी सेलिब्रेशनपासून दूर राहणार असल्याचं सांगितलं आहे. होली मिलन कार्यक्रमात यंदा सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी; कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

आपली संस्कृती ही आपल्या सणांमधूनच जपली जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसची दहशत असल्याने होळी, धुळवड खेळताना काळजी घ्या. या व्हायरसला घाबरून जाऊ नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.