CM Eknath Shinde On Disha Salian Case: दिशा सॅलियन प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे, म्हणाले 'गलबत आणखी भरकटले'
CM Eknath Shinde On Disha Salian Case | (Photo credit: archived, edited, representative image)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (20 डिसेंबर) दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रत्युत्तराच्या भाषणाने गाजला. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. खास करुन दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन (Disha Salian Case) टीका करताना मुख्यमंत्र्यांनी नोमोल्लेख न करता चिमटे काढले. या प्रकरणामुळे विरोधकांचे आगोदरच दिशाहीन असलेले गलबत आणखीच भरकटले असा टोला लगावला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र आले तेव्हाच त्यांचे अवसान गळल्याचे दिसून आले होते. इंडिया आघाडीमध्ये वरिष्ठ नेते जागावाटपात व्यग्र असल्याने विरोधी पक्ष आगोदरच दिशाहीन झाला होता. त्यातच दिशा सॅलियन प्रकरण आले आणि त्यांचे दिशाहीन गलबत आणखीच भरकटले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. या वेळी बोलताना त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत सरकारची पाट थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही जेव्हा राज्याची सत्ता हातात घेतली तेव्हा हे राज्य पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आणले. इतकेच नव्हे तर मेट्रो, कारशेड, समृद्धी, बुलेट ट्रेन, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवरुन सुरु असलेला यू टर्न पुन्हा बंद केला असेही ते म्हणाले. त्यामुळे नाईलाजाने का होईना आमच्या कामाला चांगले झाले असे विरोधक म्हणून लागले आहेत, असेही ते म्हणाले. (हही वाचा, Aaditya Thackeray News: दिशा सॅलियन प्रकरण आणि SIT बाबत आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर 'भीतीतून बदनाम करण्याचे उद्योग')

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी सभागृहात केलेल्या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देताना, 'आपल्या आदर्श कारभारामुळे अशोकपर्व चमकले पण मराठा पर्व अंधारात राहिले' असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या जिव्हाळ्याच्या विषयात राजकारण केले. इतकेच नव्हे तर आपण अध्यक्ष होऊ नये यासाठी पडद्याआढून प्रयत्न केले. आपण अध्यक्ष झालो तर चांगले काम करुन लवकरात लवकर निर्णय घेऊ, अशी भीती त्यांना वाटत होती, अशी टीका, अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तरादाखल टीका केली.

धारावी बचाव मोर्चावरुन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नामोल्लेख टाळत टीका केली. ते म्हणाले, धारावीकरांसाठी विकास महत्त्वाचा आहे. आम्ही धारावीमध्ये चांगले काम करत आहोत. त्यामुळे धारावीतून उलट मोर्चाही निघू शकतो. आपला प्रवास केवळ मातोश्री ते मातोश्री दोन असाच अभिमानास्पद राहिला आहे. आगोदरच्या सरकारमध्ये इतका भ्रष्टाचार सुरु होता की, लोक जेव्हा भीतीच्या वातावरणात जगत होते तेव्हा पैसे खाण्याचे उद्योग सुरु होते. त्यांना कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील, इतका भ्रष्टाचार सुरु होता असेही मुख्यमंत्री म्हणाले.