CM Eknath Shinde Awarded D Leet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मान; पाहा कोणत्या विद्यापीठाने दिली पदवी (Watch Video)
Eknath Shinde | (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना डी.लीट पदवी (D Litt Degree) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डी वाय पाटील विद्यापीठाच्या (D Y Patil University) दिक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम डी वाय पाटील स्टेडीयमवर पार पडला. कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात नागरिक आणि रुग्णांना वैद्यकीय सोयी, ऑक्सिजन आणि रुग्णालयातील खाटा, रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांसाठी आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनिय कामासाठी त्यांना डीलीट प्रदान करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांना डीलीट प्रदारन करताना महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली तेव्हा राबवलेले मदत कार्य, कोल्हापूर आणि महाड येथे आलेल्या महापूरावेळी केलेल्या कामाचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला. या कामामुळेच त्यांना डीलीट पदवीने सन्मानित करण्या येत असल्याचे या वळी सांगण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. (हेही वाचा, CM Eknath Shinde On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या 'सावरकर विरोधी' वक्तव्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धिक्कार; राज्यात निघणार 'सावरकर गौरव यात्रा')

डी.लीट पदवी नेमकी काय आहे?

डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Litt.) ही एक शैक्षणिक पदवी आहे. ज्याला उच्च डॉक्टरेट असेही म्हटले जाते. जी काही देशांमध्ये पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) च्या पलीकडे मानली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने विशिष्ठ क्षेत्रात किंवा त्याच्या क्षेत्राच्या बाहेर केलेल्या विद्वत्तापूर्ण कामगिरीची ओळख म्हणून अनेक देशांमध्ये विद्यापीठे आणि विद्वान संस्थांकडून ही पदवी दिली जाते. अनेकदा त्याच्या शीर्षकाचा भाग म्हणून "साहित्य" हा शब्द समाविष्ट केला जातो (जसे की डॉक्टर ऑफ लेटर्स). उत्तर अमेरिका उत्तर अमेरिकेत, पदवीला डॉक्टरेट ऑफ लेटर्स किंवा डॉक्टरेट इन ह्युमन लेटर्स (ज्याला काही संस्था ह्युमन लेटर्समध्ये डॉक्टरेट म्हणून प्रस्तुत करतात) असेही म्हणतात. डी.लिट. मानविकीमधील ललित कला विद्वानांना पदवी दिली जाते.

ट्विट

दरम्यान, भारतातील साहित्य किंवा भाषा क्षेत्रातील प्रतिष्ठित लेखक, विद्वान आणि संशोधकांना सन्मानित करण्यासाठी अनेक भारतीय विद्यापीठांद्वारे डॉक्टर ऑफ लिटरेचर हा पुरस्कार दिला जातो. या उद्देशाने प्रदान केलेल्या सर्वोच्च शैक्षणिक पदवींपैकी एक मानली जाते.