मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्नी अमृता यांच्याकडून खास ट्वीटच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा
अमृता फडणवीस (Photo credit : youtube)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसांचं औचित्य साधून राजकीय नेते मंडळींसह सामान्यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आगामी राजकीय वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभळण्याच्या शैलीचं, कार्य पद्धतीचं कौतुक केलं आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बर्थ डे दिवशी त्यांची बेटर हाफ अमृता फडणवीस यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपले सर्वांचे प्रीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis ज़ींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 💐' असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी दिल्या खास 'ट्वीट' च्या माध्यमातून शुभेच्छा!

अमृता फडणवीस यांचं ट्विट

ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी खास फॅमिली फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि त्यांची मुलीचा फोटो शेअर केला आहे. अमृता फडणवीस या बॅंकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मात्र व्यावसायिक जबाबदारी सांभाळत करियर आणि घर सांभाळणार्‍या अमृता फडणवीस आपली गायन कौशल्यानेही अनेक समाजसेवी उपक्रम राबवतात. गायकी गळा असलेल्या अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये कॅन्सर बाबत जनजागृती करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. गायनासोबत फीटनेस फ्रीक असणार्‍या अमृता, पती देवेंद्र फडणवीस यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी विशेष मेहनत घेतात. फडणवीस कुटुंब नियमित योगसाधना करतात.

अमृता फडणवीस ट्रोल

अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा देताना केलेल्या व्याकरणातील चूका दाखवत काहींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.