CM Devendra Fadnavis Speaking On Mahalaxmi Express Incident (Photo Credits: Twitter, File Image)

राज्यात पावसाने घातलेल्या थैमानामुळे उल्हास नदीला(Ulhas River)  पूर येऊन आसपासच्या परिसरात पुराचे पाणी  शिरल्याचे समजत आहे. वांगणी (Vangani) आणि बदलापूर (Badlapur) स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळावर सुद्धा या पुराच्या पाण्याचा शिरकाव होऊन साधारण गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे काल रात्रीपासून या स्थानकाच्या मध्येच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसची (Mahalaxmi Express)  वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार यामध्ये तब्बल 2000  प्रवासी अडकून पडले होते ,त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ व आरपीएफ चे पथक कालपासून कार्यरत होते. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्य सचिवांना सुद्धा जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

CMO ट्विट

एनडीआरएफची चार पथके घटनास्थळी कार्यरत असून,आठ बोटाच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर आणण्याचे प्रयत्न करत आहेत.आतापर्यंत या बचावकार्यात एकूण 550 जणांची सुटका अरण्यात य पंथाला यश लाभले आहे. ट्रेनच्या डब्ब्यात अडकलेल्या प्रवाशांना रेल्वे पोलीस व प्रशासनाकडून कालपासून खाण्यापिण्याचे पदार्थ पुरवून धीर दिला जात होता , तसेच या कामात मदत कारण्यासाठे अनेक सामाजिक संस्थांना देखील आवाहन करण्यात आले होते .(मुंबईतील पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

दरम्यान, मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर सध्या ओसरला आहे, मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन तीन दिवसात पाऊस कायम राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था पुर्वव्रत होण्यास अजून काही वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.