CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

73rd Indian Independence Celebration in Maharashtra:  भारतामध्ये यंदा 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. देशाला संबोधित करताना देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी या तिन्ही दलांवर एक प्रमुख नेमणार असल्याची घोषणा आज मोदींनी लाल किल्ल्यावरील भषणात केली आहे. तर महाराष्ट्रामध्येही मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. 'नवभारताच्या निर्मितीसाठी अविश्रांत काम करण्याचा संकल्प, हाच स्वातंत्र्यदिनाचा संदेश' असं खास ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी 73 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Independence Day 2019 PM Modi Speech Live: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची विरोधकांमध्ये हिंमत नव्हती, आम्ही ती दाखवली - पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. दक्षिण मुंबईमध्ये सीएसएमटी रेल्वेस्थनकासह, मुंबई महानगर पालिका कार्यलय, मंत्रालय इमारत येथे तिरंग्यामध्ये खास रोषणाई करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

मंत्रालयातील भाषण

सरसंघचालक मोहन भागवत 

मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहेत याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. राज्यातील आरक्षणांच्या मुद्द्यापासून ते सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती देताना सबका साथ सबका विकास सोबत राज्याच्या सक्षम विकासाची माहिती दिली.