नगारा एकत्र बडवून युतीचे संकेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि देवेंद्र फडणवी, मुख्यमंत्री (Archived, edited images)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena Party  chief Uddhav Thackeray) यांनी कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपिठावर हजेरी लावत नगारा वाजवला. निमित्त होते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील संत सेवाला महाराज मंदिर परिसरातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात फडणवीस आणि ठाकरे यांनी एकत्र वाजवलेला नगारा पाहून हे आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचे  (Shiv Sena-BJP Alliance )तर संकेत नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. मात्र, सत्तेत असूनही दोन्ही पक्ष वेळोवेळी एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे दिसते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही अनेकदा मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात टीका नित्याने केली जाते. तरीही भाजप नेते आमची शिवसेनेसोबोत युती होणार हे सांगत असतात. तर, शिवसेना या वक्तव्यांना गांभीर्याने घेतना दिसत नाही. दरम्यान, अलिकडील काळात ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक ही दोन्ही पक्षांच्या युतीला बळ देणारी असल्याचे निरिक्षण राजकीय विश्लेशक वर्तवतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिर परिसारातील विकास कामंचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमावेळी दोन्ही नेत्यांनी वंजारी समाजाचे नागारा हे पारंपरीक वाद्य वाजवले. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्रिमंडलातील इतर मंत्र्यांसह अनेक कार्यकर्ते आणि वंजारी समाजातील नागरिक उपस्थित होते. (हेही वाचा, दाते समितीच्या शिफारशी बंजारा समाजाला लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार: मुख्यमंत्री)

दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाडीने जाण्याऐवजी प्रोटोकॉल बाजूला ठेवला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बुलेट प्रुफ टाटा सफारीतून कार्यक्रमास हजेरी लावने पसंद केले. त्यामुळे या प्रवासात दोघांनी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.