Mumbai: मुंबईतील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

ठाणे आणि मुंबईतील अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या आणि उपमहानिरीक्षक दर्जाच्या पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरची (Transfers of IPS officers) स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उठवली आहे. या प्रक्रियेत सल्ला न घेतल्याबद्दल शिवसेनेच्या एका शक्तिशाली मंत्र्यासह शिवसेनेच्या एका गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर एप्रिलमध्ये बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. 20 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या याआधीच्या बदलीच्या आदेशात राजेंद्र माने यांची ठाणे पोलिस पूर्व विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, महेश पाटील यांची मुंबईत अतिरिक्त आयुक्त (वाहतूक), संजय जाधव यांची ठाणे पोलिस प्रशासन शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, पंजाबराव उगले यांची अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दत्ता शिंदे हे मुंबई पोलिसात अतिरिक्त आयुक्त (संरक्षण) आहेत. बदल्यांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी राज्याच्या गृहविभागाने सल्लामसलत न केल्याने सेनेचे मंत्री नाराज झाल्याने ही प्रक्रिया थांबली होती. ठाकरे यांनी मंगळवारी सर्व बदल्यांना मंजुरी दिली, तर 20 एप्रिलच्या आदेशानुसार महेश पाटील आणि संजय जाधव या पाचपैकी केवळ दोन अधिकाऱ्यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत. हेही वाचा प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी Asaduddin Owaisi आणि Swami Yati Narasimhananda यांच्यावर FIR दाखल

ताज्या आदेशात राजेंद्र माने यांची सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी, पंजाबराव उगले यांच्याकडे ठाणे पोलीस पश्चिम विभागाचा तर दत्ता शिंदे यांच्याकडे ठाणे पोलीस पूर्व विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या संरक्षण शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ठाणे पश्चिमचे अतिरिक्त आयुक्त ए.डी. कुंभारे यांच्यासह अन्य पाच अधिकाऱ्यांच्याही राज्याने बदल्या केल्या आहेत.  नंदकुमार ठाकूर यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी, अतुल कुलकर्णी यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी, तर ठाणे पोलिसांचे डीसीपी बाळासाहेब पाटील यांची पालघरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.