बीएमसी ने मुंबई मध्ये स्वच्छता राखण्यासाठी पुन्हा क्लिन अप मार्शल स्कीम आणली आहे. 2 एप्रिल पासून हे क्लिन अप मार्शल पुन्हा तैनात असणार आहेत. मुंबई शहरात गर्दीच्या ठिकाणी हे क्लिन अप मार्शल घाण करणार्यांकडून ऑनलाईन माध्यमातून दंड वसुली करणार आहेत. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, सीएसएमटी या भागात ते तैनात असतील. विशेष बाब म्हणजे आता हे मार्शल कागदी पावत्यांऐवजी क्यू आर कोड च्या माध्यमातून दंड वसुली करणार आहेत. क्लिन अप मार्शल आता नागरिकांना रस्त्यावर थुंकण्यासाठी, उघड्यावर शौच केल्यास, कचरा फेकल्यास दंड आकारणार आहेत. हा दंड 200 रूपये ते 1000 रूपये दरम्यान असू शकतो.
पूर्वी काहींनी पर्यटकांकडून पैशांची वसुली होत असल्याचं, दंडाची पावती मिळत नसल्याची तक्रार समोर आली होती. त्यामुळेच 2007 मध्ये सुरू करण्यात आलेली पहिली क्लीन-अप मार्शल योजना बीएमसीने 2011 मध्ये बंद केली होती. बीएमसीने प्रत्येक 24 वॉर्डांमध्ये 30 मार्शल तैनात करण्यासाठी निविदा मागवून जुलै 2016 मध्ये ही योजना पुन्हा आणली होती.
Clean-up Marshals are back in Mumbai!
This time it's completely digital. Check the uniform.
The BMC has said that 30 marshals are deployed in each wards.
Penalty will be through BMC's newly developed app.
Digital payment options for violators. Citizens can pay using QR… pic.twitter.com/izdBR17p7x
— Jeet Mashru (@mashrujeet) April 2, 2024
बीएमसीने 'क्लीन अप मार्शल' योजना पुन्हा लाँच केली आहे, ज्यामध्ये 200-रु. 1000 रुपयांच्या दंडासह मोबाइल ॲपद्वारे दंडाच्या पावत्या जारी केल्या आहेत. या योजनेत मागील तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे आणि निरीक्षणासाठी जिओ-टॅगिंग फीचर देखील समाविष्ट केले आहे. त्यांच्या मोबाइलला ब्लूटूथद्वारे जोडलेला एक छोटा प्रिंटर आहे. ते दंडाची पावती छापू शकतात आणि रक्कम त्यांच्या एजन्सीमध्ये जमा होणार आहे.
पालिकेत हा क्लिनअप मार्शलचा शेवटचा करार 2022 मध्ये संपला, परंतु शहराला शिस्त लावण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये यासाठी मार्शलची गरज आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बीएमसीने डिजिटल पेमेंट आणि मार्शल्सची कल्पना मांडली. आता दंड वसुलीचा ऑनलाइन पेनल्टी प्लॅटफॉर्म बीएमसीच्या आयटी विभागाने विकसित केला आहे.