CIDCO Lottery 2019 : सिडको (CIDCO) कडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या 'स्वप्नपूर्ती हाऊसिंग स्किम' (Swapnapurti Housing Scheme 2019) आणि 'मास हाऊसिंग लॉटरी' (Mass Housing Lottery) च्या घरांच्या सोडतीचं राजिस्ट्रेशन आता संपलं आहे. आज (5 नोव्हेंबर) दिवशी तुम्ही या रजिस्ट्रेशनमध्ये शेवटचे एडिट्स करू शकणार आहात. तर पेमेंट करण्यासाठी 6 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे यंदा तुमच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच फोर्ममध्ये बदल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अन्यथा तुम्ही या वर्षीची सिडकोचं घर घेण्याची एक मोठी संधी गमवाल.
नवी मुंबई मध्ये 11 सप्टेंबर 2019 पासून सिडकोच्या 9249 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत 2.10 लाख घर उपलब्ध करुन दिली आहेत. सिडको गृहनिर्माण योजना जाहिरात इथे सविस्तर पहा.
स्वप्नपूर्ती हाऊसिंग स्कीम 2019
रजिस्ट्रेशन एडीट करण्याची शेवटची संधी: 5 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची संधी: 6 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत
मास हाऊसिंग स्कीम 2019
रजिस्ट्रेशन एडीट करण्याची शेवटची संधी: 5 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची संधी: 6 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत
नवी मुंबईमध्ये पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांमध्ये सिडको आता नवी घरं बांधणार आहेत. सध्या सिडकोने दिलेल्या जाहिरातीतील 1 लाख 10 हजार घरांपैकी 62,976 घरं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांसाठी तर 47,040 घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.