Chitra Wagh | (Photo Credits-Facebook)

संजय राठोड (Sanjay Rathod) हा मनुष्य मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचा नाही. त्याला चपलेने झोडले पाहिजे, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यसरकारवर टीका करताना वाघ यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

मुख्यमंत्री संवेदनशील म्हणून ओळखले जातात. परंतू, बलात्कारी व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून ते जर मंत्रिमंडळात बसत असतील तर ती अत्यंत लाजिवरवाणी बाब आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही आमचा सुरुवातीपासूनच संशय होता, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Sanjay Rathore: चौकशीतून सर्व समोर येईल, आज मला काहीही बोलायचं नाही- संजय राठोड)

चित्र वाघ यांनी दावा केला की, पुणे पोलिसांनी ज्या दोन मुलांची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना केवळ जुजबी चौकशी करुन सोडून देण्यात आले आहे. आज ही दोन्ही मुले पुणे पोलिसांकडे नाहीत. पुणे पोलिसांनी राष्टीय महिला आयोगाकडे अहवाल देण्यात आला आहे. परंतू, हा अहवाल राज्यातील जनतेच्या डोळ्यात केलेली केवळ एक धुळफेक आहे, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारमध्ये बलात्कारी मंत्र्यांना वाचविण्यासाठी चढाओढ सुरु आहे. एका मंत्र्याने अशाच प्रकारे स्वत:चा बचाव केला आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र, त्यांनी धनंजय मंडे यांचे नाव घेतले नाही.