Thane: ठाणे येथील नामांकीत शाळेत लहान विद्यार्थ्यांचा विनयभंग
Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शालेय सहल घेऊन गेलेल्या बसमध्ये लहान मुलामुलींचा विनयभंग (Molestation) झाल्याची धक्कादायक घटना ठाणे (Thane) येथील एका नामांकीत शाळेत घडल्याचे पुढे येत आहे. सीपी गोयंका इंटरनॅसनल स्कूल (Goenka International School Thane) असे या शाळेचे नाव आहे. सांगितले जात आहे की, जावेद खान (27) नामक व्यक्तीने या मुलांसबत आक्षेपार्ह कृत्य केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही सहल घेऊन गेल्यावर विद्यार्थ्यांना सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या महिला आणि पुरुष शिक्षकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया शालेय प्रशासनाकडून सुरु असल्याचे समजते.

विद्यार्थ्यांची पालकांकडे तक्रार

लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, सदर शाळा ठाणे येथील कापुरबावडी परिसरात आहे. सर्वच शाळा काढतात त्या प्रमाणे सी पी गोयंका शाळेनाही आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन सहल काढली होती. दरम्यान, बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या जावेद याने प्रवासादरम्यन मुलांचा विनयभंग केला. धक्कादायक म्हणजे मुलांनी आपल्या पालकांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितल्यानंतर घडल्या प्रकाराचा भांडाफोड झाला. इतकी मोठी घटना घडूनही सहलीवर मुलांसोबत असलेल्या शिक्षकांना याबाबत कोणतीच माहिती कशी काय मिळू शकली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा, Mumbai News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, मालाड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल)

शालेय प्रशासनाविरोधात पालकांचा ठिय्या

दरम्यान, पालकांना घडलेल्या घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पालक मोठ्या प्रमाणावर शालेय आवारात जमले आणि त्यांनी प्रशासनाचा निशेध नोंदवला. प्रशासनाविरोधात शालेय आवारातच त्यांनी ठिय्या मांडला. शिवाय, जावेद नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन त्याला तातडीने अटक करा अशीही मागणी नागरिकांनी लावून धरली. (हेही वाचा, Bigg Boss 11 मध्ये सहभागी अभिनेत्रीचा मित्रावर बलात्कार केल्याचा आरोप; पोलिसात गुन्हा दाखल)

मनसे आणि शिंदे गटाकडून आक्रमक पवित्रा

विद्यार्थ्यांसोबत घडलेला प्रकार समजता मनसे नेते अविनाश जाधव आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर हे देखील आपापल्या कार्यकर्त्यांसह शाळेत आले. त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. शाळेतील मुले असुरक्षीत आहेत. शाळेने मुलांच्या सुरक्षीततेबद्दल कोणत्या प्रकारची कारवाई केली, याबाबत माहिती द्यावी. तसेच, मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई कराव, जोपर्यंत ही कारवाई केली जात नाही तोपर्यंत पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी घेतली. आता शाळा प्रशासन पुढे काय कारवाई करणाय याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाणे जिल्ह्यात असलेल्या आणखी एका शाळेमध्ये असाच काहीसा प्रकार यापूर्वीही घडला होता. कळवा येथील नामांकीत शाळेमध्ये एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. या शिक्षकाविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत शालेय प्रशासनाला जाब विचारला होता. पुढे त्या शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.