मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तुरुंगात जाईल, Kirit Somaiya यांचा इशारा
Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यानंतर परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांनाही ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बेनामी कारभारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव असल्याचे म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील 12 जणांचे आहे. घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असाही इशारा त्यांनी दिला आहे. सांगली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी खरमाटे यांच्या सांगलीमधील मालमत्तांची सोमय्या यांनी सोमवारी पाहणी केली. त्यानंतर सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. खरमाटे यांना 70 हजार पगार आहे. मग त्यांच्याकडे इतकी संपत्ती कशी आली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी विचारला आहे. खरमाटे यांची सोन्या-चांदीची दुकाने, त्यांच्या मुलाच्या नावावर अनेक उद्योग आहेत. जर, अनिल परब यांचे सचिव खरमाचे यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, मग अनिल परब यांच्याकडे किती संपत्ती असेल? असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा-Nagpur: नागपूरमध्ये सुरु झाली Covid-19 ची तिसरी लाट; 3-4 दिवसांत लागू होणार लॉकडाऊन- Guardian Minister Nitin Raut

याशिवाय, राज्य सरकारच्या बेनामी कारभारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव आहे. उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार बेनामी सरकार आहे. त्यांचे इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.